भद्रावती:- चहा तयार करतांना सिलेंडरनी पेट घेऊन आग लागली. या आगीत स्वयंपाक घरातील काही किरकोळ वस्तु जळाल्या. मात्र, वेळीच समयसुचकता दाखवित आजुबाजुच्या लोकांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.सदर घटना शहरातील पद्मावार वाडी परीसरातील एका घरात दिनांक 1 मे सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही. शहरातील पद्मावार वाडी परिसरात किशोर अंबाघरे हे गृहस्थ आपल्या कुटुंबासह राहतात. मोलमजुरी करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घटनेच्या दिवशी घरातील महिलेने चहा तयार करण्यासाठी गॅस पेटविला यावेळी सिलेंडरने पेट घेउन आग लागली. हा प्रकार आजुबाजुंच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यानी समयसुचकता दाखवित मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी त्यात यश आले नाही, मात्र काही अनर्थ घडण्याच्या आत त्यांना या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
सदर स्फोटात घरातील कपडे, धान्य, सोफा, टीव्ही, फ्रीज, स्वयंपाक खोलीतील संपूर्ण सामान जळून खाक झाले. गौरीशंकर पांडे यांच्या कुटुंबात पत्नी कोमल यांच्याबरोबरच मुलगा कुणाल व मुलगी शेजल असा परिवार आहे. या स्फोटात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.