सैन्यदलात भरतीसाठी नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण | Batmi Express

Be
0
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur News IN Marathi,

  • 25 मे रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखत

चंद्रपूर, दि. 15: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून सर्व्हीस सिलेक्शन बोर्डाच्या (एस.एस.बी.) परिक्षेची तयारी करून घेण्यासाठी राज्य शासनातर्फे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. सदर पुर्वप्रशिक्षण कोर्स क्र.53 दिनांक 29 मे ते 07 जून 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून यासाठी प्रशिक्षणार्थ्यांच्या निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

 एस.एस.बी. प्रशिक्षणाकरिता प्रवेश मिळविण्यासाठी कम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी एक्झामिनेशन पास असणे किंवा एन.सी.सी. चे ‘सि’ प्रमाणपत्र अे किंवा बी ग्रेड मध्ये पास असावे व एन.सी.सी. ग्रुप हेडक्वार्टर्सने एस.एस.बी.साठी शिफारस केलेली असावी किंवा टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे किंवा युनिर्व्हसिटी एन्ट्री स्कीम साठी एस.एस.बी.चे कॉल लेटर अथवा शिफारस यादीत नाव असावे.

सैन्यपुर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक 25 मे 2023 रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येतेवेळी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफअर पुणे या फेसबुक पेजवरून किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून एस.एस.बी.-53 कोर्ससाठी प्रवेशपत्र भरून सदर प्रिंट सोबत आणावी.

अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या ईमेल आयडी [email protected] किंवा 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष भेटावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->