कोरची येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी | Batmi Express

Gadchiroli Live News,Gadchiroli,Korchi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची प्रतिनिधी
- अखंड विश्वाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणारे महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती बौद्धधम्मावर प्रेम आणि आस्था ठेवणार्‍यांसाठी एक महापर्व आणि मंगल दिन मानला जातो. बुद्ध जयंती भारतातच नाही तर जगभरातील १८० देशात हा सण उत्साहात साजरे करतात. बुद्धाचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अश्या तीन महत्वपूर्ण घटना वैशाख पौर्णिमेलाच घडल्या. अश्या महान आणि जग विख्यात पौर्णिमेला दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कोरची येथे  मोठ्या उत्साहात साजरे करत आपन जुन्या, जीर्ण आणि विषमतावादी, बुद्धिविसंगत ,काल्पनिक, अतार्किक व मानव समाजात अंध-श्रद्धा पसरविणाऱ्या भोंदू वृत्तीच्या कर्मकांडावर मात करून विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगण्याचे संकल्प समाज बांधवांनी घेतला. 

पहिल्यांदा सकाळी ७० ते ७५ वर्ष जुने असलेल्या बाजार चौकातील बौद्ध ध्वजा जवळ तथागत बोधिसत्व गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून पुष्प हार अर्पण करण्यात आले व त्यानंतर को -ऑपरेटिव्ह बँक कोरची येथील सह मॅनेजर सोरदे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते. त्यानंतर रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई भैसारे यांच्या हस्ते धम्मभूमी येथे दीप प्रज्वलित करून ध्वजारोहण करण्यात आले. तसेच लुंबीनी विहारामध्ये जाऊन तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व जोतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना माल्यार्पण करून रमाई महिला मंडळाच्या सचिव छायाताई  साखरे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व सर्व बौद्ध बांधवांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. दुपार पासून भोजन तयार करण्यासाठी लगबग सुरू होती आणि सामूहिक भोजन तयार करून सायंकाळी बुद्ध वंदना घेऊन प्रा. गजभिये सरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,  जगात बुद्ध धम्मा सारखा कोणता धर्म  नाही आणि जगाला आज युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे असे मार्गदर्शन केले तर जिवन भैसारे सरांनी बुद्ध काळात प्रकाश टाकला व गीता राऊत मॅडम यांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान काय हे सांगितले तर काही उपासिकांनी गीत गायन केले. सर्व समाज बांधवांनी भोजनाचा आस्वाद घेतला. कोरची शहरातील  या सर्व कार्यक्रमाला  सर्व बौद्ध समाज बांधवांनी सहकार्य केले व बुद्ध पोर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.