वडसा(गडचिरोली) :- वडसा-कुरखेडा मार्गावरील दुग्ध डेअरी (तुळशी फाटा) जवळ वीज पडून अख्खे कुटूंबच ठार झाल्याची घटना आज २४ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.भारत लक्ष्मण राजगडे वय ३२ वर्षे संगीतकार रा.आमगांव व त्यांची पत्नी अंकिता भारत राजगडे वय ३० वर्षे दोघेही पती-पत्नी आपल्या दोन्ही लहान मुलांसह गरगळा येथुन लग्न लावून येत असतांना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात होऊन वीज कडाडने सुरू झाले.
वीज कडाडत असल्याने राजगडे यांनी दुग्ध डेअरी जवळील एका झाडाच्या खाली आसरा घेतला असता अचानक वीज अंगावर पडल्याने राजगडे कुटूंबातील चारही जण जागीच मृत्युमुखी पडले.याबाबत दसाईगंज पोलीसांनी घटनास्थळ गाठून चारही जणांचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय वडसा येथे पाठविले पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.