'
30 seconds remaining
Skip Ad >

Gondwana University: अभाविपचे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. बोकारे यांना निवेदन | Batmi Express

0

Gondwana University,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli Batmya,

गडचिरोली (Gadchiroli) : 
अभाविपचे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. बोकारे यांना विविध मागण्याकरिता निवेदन केले आहेत. यामध्ये विद्यापीठ परीक्षा शुल्क किमान पाच वर्ष कायम ठेवावे. त्यात प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात वाढ करण्यात येऊ नये. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित अनेक महाविद्यालयांमध्ये प्राचार्य पद रिक्त असून अनेक महाविद्यालय कार्यकारी प्राचार्याच्या भरवशावर चालतात. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ प्राचार्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने उचित पावले उचलावी.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये एकही पूर्णवेळ प्राध्यापक नसताना सुद्धा अशा महाविद्यालयाला विद्यापीठातर्फे प्रवेशाची मान्यता दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे अनुभव ज्ञान गुणवत्ता पूर्ण राहत नाही. त्यामुळे ज्या महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक एकही नाही. अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना संलग्निकरण देऊ नये. तसेच अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी.

विद्यार्थ्यांना परीक्षा दिलेल्या उत्तरपत्रिका त्यांना त्याच्या लॉगिन आयडी वर दाखवण्यात यावा, जणेकरून विद्यार्थ्यांना रिचेकिंगला गुणपत्रिका द्यायची असल्यास आर्थिक ब्रुदंड पडणार नाही. विद्यार्थ्यांना वाटले कि, त्याचे गुण वाढू शकतात तर तो तिथे शुल्क भरणा करेल यातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल व विद्यार्थ्यांना असे वाटणार नाही कि, त्याच्यावर अन्याय होत आहे. ज्या विषयात विद्यार्थी हा नापास झालाय त्याच विषयांचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात यावे. पूर्ण विषयाचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. विद्यापीठाने हि विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

विद्यापीठाचे परिपत्रक व नोटिफिकेशन विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स ॲप नंबर वर पाठविण्यात यावे. परीक्षा होऊन बराच काळ होऊन सुद्धा परीक्षाचे निकाल अद्यापही लागले नाही. त्याचबरोबर रिचेकिंगचे सुद्धा बरेच निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आलेले नसताना महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर भरण्यासाठी सांगितले जात आहेत. अशात विद्यार्थी हा हवालदिल झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाने लवकरात लवकर उर्वरित परीक्षांचे निकाल लावावेत जणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.

वरील सर्व मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा अभावीप तीव्र आंदोलन करेल असा प्रंत मंत्री शक्ती केराम यांनी विद्यापीठाला इशारा दिला.

यावेळी विदर्भ प्रांत मंत्री शक्तीजी केराम, गोंडवाना विद्यापीठचे सिनेट सदस्य यशजी बांगडे, जयेश ठाकरे प्रांत सोशल मीडिया सह-संयोजक, नगर सहमंत्री हिरालाल नुरूती, भाग-संयोजक तुषार चुधरी, राहूलजी श्यामकुवर नगर विस्तारक गडचिरोली व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×