चंद्रपूर: ६ व्या वर्गातील विद्यार्थिनीवर २२ वर्षीय युवकाचा लैंगिक अत्याचार | Batmi Express

Ballarpur,Chandrapur News,Chandrapur,Molested,Chandrapur Live,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News Live,Chandrapur Today,

Ballarpur,Chandrapur News,Chandrapur,Molested,Chandrapur Live,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News Live,Chandrapur Today,

बल्लारपूर (Ballarpur) : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या ६ व्या वर्गातील मुलीवर जंगलात नेऊन २२ वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार (Sexual assault) केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार राजुरा शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पीडित मुलगी सहाव्या वर्गात शिकत होती. ३ एप्रिल रोजी सदर पीडित शाळा सुटल्यावर खाऊ घेण्याच्या उद्देशाने बाहेर निघाली असता तिथे मागावर असलेल्या २२ वर्षीय युवकाने तिला बोलावले. सदर युवक पीडितेच्या नात्यातील असल्याने मुलगी त्याच्याकडे गेली. त्यांनतर त्याने घरी पोहचवून देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या दुचाकीवर बसविले. इकडे शाळेची बस निघण्याची वेळ होऊनही ती मुलगी न आल्याने बस चालकाने ही माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली. शाळा प्रशासनाने चौकशी केली असता ती विद्यार्थिनी एका युवकाच्या दुचाकीवर बसुन गेल्याचे स्पष्ट आल्याने त्यांनी मुलीच्या पालकांना माहिती देऊन मुलीचा शोध घेण्यास सांगितले.

मुलगी परस्पर निघुन गेल्याचे कळताच पालकांनी शोध सुरू केला मात्र, सदर पीडिता काही वेळाने घरी परतली. पालकांनी मुलीची चौकशी केली असता नात्यातील २२ वर्षीय युवकाच्या दुचाकीने आपण शाळेतून आल्याचे तिने सांगितले. अधिक माहिती घेतली तेव्हा मुलीने त्या युवकाने आपल्याला जंगलात नेऊन अतिप्रसंग केल्याचे पिडितेने सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच पीडितेच्या आईने रात्रीच राजुरा पोलीस ठाणे गाठून अत्याचाराची तक्रार नोंदविली.

प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी त्या युवकाच्या गावात जाऊन युवकाला अटक (arrested) केली असुन वैद्यकीय तपासणीअंती त्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी युवकावर भादंवि च्या कलम ३७६, ३७६ अ, ब, ३६३ तसेच बाल लैंगिक अत्याचारांच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्ह्याची नोंद करून न्यायालयातून आरोपीची तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.