Breaking! टिप्परची दुचाकीला जबर धडक; ५ वर्षाची नात व आजोबा जागीच ठार | Batmi Expres

Be
0
Bhandara Accident,Bhandara,Bhandara Live,Bhandara Marathi News,Maharashtra,Bhandara Batmya,Bhandara News,

भंडारा :- आज दुपारी शाळेची सुट्टी झाल्यानंतर गावाकडे जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला अचानक धडक यात ५ वर्षाची नात व ७० वर्षाचे आजोबा यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज २५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

  • महेंद बडवाईक (वय ५ वर्षे )  - रा.नवीन पुनर्वसन पिंडकेपार (बेला) 
  • कवळू बडवाईक ( वय ७० वर्षे ) -  रा.नवीन पुनर्वसन पिंडकेपार (बेला) 

असे या भीषण अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातचे नाव आहे.

कवळू बडवाईक हे आयुध निर्माणीतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांची नात वाणी ही भंडारा येथील गायत्री विद्या मंदिरात शिक्षण घेत होता . तिला दररोज सकाळी शाळेत घेऊन जाणे व सुटीनंतर तिला परत आणणे असा त्यांचा नित्यक्रम होता.दरम्यान, आज दुपारी शाळेची सुट्टी झाल्यानंतर ते वाणीला घेऊन दुचाकी क्र.एमएच ३६ टी ३७५३ ने गावाकडे जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ४९/०७०१ ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.  अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी टिप्परचाल काविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->