'
30 seconds remaining
Skip Ad >

HSC Paper Copy : कॉपी प्रकरणात 11 विद्यार्थी रस्टीकेट | Batmi Express

0

Wardha,Education,HSC 2023 Exam,HSC 2023,Wardha live,wardha news,Nagpur,HSC Paper Copy,HSC Exam Copy News,HSC Paper Copy 2023,HSC Paper Copy News,

वर्धा : 
इयत्ता बारावी परीक्षेचा रसायनशास्त्र व राज्यशास्त्राचा पेपर सुरु असतांना अतिसंवेदनशिल परीक्षा केंद्रावर भरारी पथकांनी केलेल्या केलेल्या कारवाईत परीक्षेदरम्यान कॉपी करतांना आढळून आलेल्या 11 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.  

इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेचा रसायनशास्त्र या विषयाचा पेपरसाठी वर्धा जिल्ह्यामध्ये 55 केंद्रावर 16 हजार 452 विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी 16 हजार 385 विद्यार्थी हजर होते व 67 विद्यार्थी गैरहजर होते. जिल्ह्यात अतिसंवेदनशील व संवेदनशील असे एकुण 44 केंद्रावर  बैठे पथक नियुक्त करण्यात आले होते. तसचे विभागीय मंडळानी नियुक्त केलेले 6 भरारी पथके यांनी वेगवेगळ्या केंद्रास भेटी दिल्या.

याभेटीत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या भरारी पथकाने माडेल हायस्कुल, आर्वी येथे भेट दिली असता तेथे अगोदर पूर्वसूचना  दिल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी गाईड्स व कॉपी जमा केल्या तरी सुध्दा  थोड्या वेळानी तेथील 2 विद्यार्थी कॉपी करतांना आढळून आले.

आदर्श हायस्कुल, आंजी येथील दुपारच्या सत्रात सुरु असणारा राज्यशास्त्रच्या पेपरला 2 विद्यार्थ्यांना कॉपी करतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या चारही विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

तसेच उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या भरारी पथकांनी वायगाव (नि.)  येथे स्व. भैय्यासाहेब उरकांदे कनिष्ठ महाविद्यालय येथे भेट दिली असता तेथे 3 कॉपीबहाद्दरवर व बुरकोणी येथील संत साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय येथील 4 कॉपीबहाद्दरवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात गैरप्रकाराला आळा  घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश सुध्दा लागू केला आहे, असे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×