गडचिरोली: होळीच्या दिनी झाडाला गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या | Batmi Express

Gadchiroli Suicide,Gadchiroli Batmya,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli News

Gadchiroli Suicide,Gadchiroli Batmya,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli News

गडचिरोली
: जिल्हा स्थळापासून अवघ्या काही किमी अंतरावर असलेल्या मुडझा येथील मधुकर सिताराम सोनुले या (62 ) वर्षीय वृद्ध शेतक-याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास ही बाब लक्षात आली. विशेष म्हणजे एकीकडे नागरीक रंगपंचमीची धुळवण उडवित असतांना वृद्ध शेतक-याने आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

प्राप्त माहितीनुसार मधुकर सोनुले हे सकाळीच घराबाहेर पडले. दरम्यान त्यांनी शेत गाठित शेतातील पिंपळाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. रंगपंचमीचा दिवस असल्याने ते गावातच रंग खेळत असतील, असा तर्क कुटूंबियांनी काढाला. मात्र दुपार होऊनही ते न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोधाशोध सुरु झाला. अशातच शेतात जाऊन बघितले असता ते झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत निदर्शनास आले. याची माहिती गावातील पोलिस पाटील यांनी गडचिरोली पोलिस ठाण्याला दिली. ठाण्याचे बीट जमादार म्हरसकोल्हे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत. मधूकर सोनुले यांना 4 एकर शेती आहे. मागील दोन वर्षापासून त्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे ते कर्जाच्या खाईत लोटले होते. याच चिंतेत त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी गावात चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.