ब्रम्हपुरी :- दिवसेंदिवस होणाऱ्या खानपाणातील बदलांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतांना दिसून येत आहेत.पूर्वी शंभर वर्षे आयुष्य जगणारे मानव आजच्या स्थितीत पन्नाशितच लुळकतात. महत्वाचे कारण म्हणजे आरोग्याची काळजी न घेणे वा त्याकडे दुर्लक्ष करून अनेक व्याधींना सामोरे जाऊन आजार बळावले जात असतात.अशाच प्रकारचे आजार ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी येथील एका रुग्णाला किडणी स्टोनचा त्रास होता.किडनी स्टोनचा त्रास वाढत जाऊन लघवीतून रक्तस्राव होऊ लागला.अखेर सर्व तपासण्या केल्यानंतर ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर तब्बल तीन तासांची शस्त्रक्रिया करून सुमारे अर्धा किलोचा खडा मूत्राशयातून बाहेर काढण्यात आला.
प्रभाकर कारू राऊत वय ५५ वर्षे रा.तळोधी असे सदर रुग्णाचे नाव आहे.त्यांना किडणीस्टोनचा आधीपासूनच आजार होता.पण एक महिन्यापूर्वी त्यांना अचानक जास्तच पोटात दुखायला लागले.लघवीतून रक्तस्राव होत असल्यामुळे त्यांनी तळोधी येथील खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सोनोग्राफी,एक्स रे काढून घेतले. शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी लगेच आस्था हॉस्पिटल गाठले.तिथे डॉ.सुमित जयस्वाल व डॉ.जयंत निकोसे यांनी अगदी कुशलतेने तीन तासांची शस्त्रक्रिया पार पाडली.रुग्णाच्या मूत्राशयातून डॉक्टरांनी अर्धा किलोचा मुतखडा बाहेर काढला.दरम्यान,त्रास होत असतानाही आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने असा आजार उदभवतो,असे डॉ.सुमित जयस्वाल यांनी सांगितले.