'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur News: अंगणात शौचास बसलेल्या पाच वर्षीय मुलाला वाघाने नेले उचलून | Batmi Express

0
Chandrapur,Chandrapur Live,Sawali,Chandrapur   News,Tiger Attack,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack,Sawali News,

 सावली:- अंगणात शौचास बसलेल्या पाच वर्षांच्या बालकावर वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यानंतर त्या बालकाला वाघाने तोंडात घेऊन तिथून पळ काढला. ही घटना गेवरा बिटातील बोरमाळा येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. हर्षद संजय कारमेंगे (५, रा. बोरमाळा) असे बालकाचे नाव आहे.

सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गेवरा बिटातील बोरमाळा येथील ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. बालकाची आई अतिक्षा ही आपल्या हर्षदला शौचास लागल्याने त्याला अंगणात बसवून उभी असतानाच वाघाने अंधाराच्या दिशेने येत हर्षदवर हल्ला केला व आईच्या डोळ्यांदेखत त्याला उचलून नेले. आईने आरडाओरड करून शेजारच्या लोकांना बोलाविले, तातडीने नागरिक धावून आले. तोपर्यंत बालकाला वाघ तोंडात घेऊन निघून गेला होता. नागरिकांनी परिसरातील झुडपात शोधाशोध केली. परंतु मुलाचा शोध लागला नाही.
तातडीने वनविभागाला व पाथरी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री अंधार असल्याने शोधमोहिमेत अडथळा येत आहे. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, घटनास्थळी सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरूरकर, पाथरीचे क्षेत्र सहायक एन. बी. पाटील, सावलीचे क्षेत्र सहायक राजू कोडापे, पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोड यांनी घटनास्थळी भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×