ब्रम्हपुरी : दिनांक 19 फेब्रुवारी 2023 ला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची393 वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर सुद्धा विविध देशात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी करण्यात आली.मौजा चिंचोली बु येथे सुद्धा दिनांक 18 फेब्रुवारी पासून हा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याकरिता विविध कार्यक्रमांचं आयोजन केले होते ,यात गावातील मुलं आणि मुलींचे कबड्डी खो-खो चे सामने आणि प्रौढ पुरुष आणि महिलांचे सुद्धा सांघिक खेळांचं आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 18 फेब्रुवारीला रात्रो लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलेला होता यात गावातील सर्व मुला मुलींनी आपल्या अंगातील विविध कला नृत्य , नक्कल ,एकांकिका सादर करून लोकांना आकर्षित केले.
दिनांक 19 फेब्रुवारीला अगदी सकाळपासूनच मंडळाने रांगोळी स्पर्धेचा आयोजन केलेलं होतं रांगोळी स्पर्धेनंतर संगीत खुर्ची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली,दुपारी 1.00 वाजता प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. धनपालभाऊ राऊत सह उद्घाटक कावडे भाऊ मार्गदर्शक म्हणून जगदीशभाऊ पिलारे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक दामोधरजी शिंगाडे सर ,उपाध्यक्ष सौ राधिकाताई बावनकुळे मॅडम सरपंच ग्रामपंचायत सुरबोडी हे होते सोबतच प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच गजाननजी ढोरे उपसरपंच रामलालजी ढोरे सेवा सह.संस्था अध्यक्ष तुळशीदासजी ढोरे तंटामुक्ती अध्यक्ष श्रीहरिजी लांडगे गावचे माजी पोलीस पाटील रघुनाथ जी पारधी , नामदेवजी गडे,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तंटामुक्ती समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि संपूर्ण गावकरी मंडळी या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगदी बालपणापासून जीवन चरित्र सुंदर अशा वक्तव्यातून रेखांकित केला सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि समाजाला आज त्यांच्या आदर्शाची नितांत गरज आहे असे प्रतिपादित केले कार्यक्रमाचे अध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्यात कधीच जातीपातीचा भेद केला नाही आणि त्यामुळेच तेथील संपूर्ण जनता एकोप्याने नांदत होती तोच एकोपा आज समाजात निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
हा उत्सव आणि सांघिक खेड यशस्वी रित्या पाडण्याकरिता प्रा.संदीप ढोरे सर शिवदास बूल्ले सर महेश पत्रे सर रोशन दिवटे चंदू भाऊ ढोरे गोवर्धन भाऊ पत्रे जगजीवन बरडे आणि गावातील सर्व तरुण मंडळींनी अधिक परिश्रम घेतला. मार्गदर्शन सोहळ्या नंतर संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय मासाहेब जिजाऊ की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर निनादून गेला रॅली नंतर महाप्रसाद देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पहिल्यांदाच हा दोन दिवसीय जन्मोत्सव सोहळा या गावांमध्ये साजरा करण्यात आला त्यामुळे या जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य गण तरुण मंडळी यांचे संपूर्ण गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.