भारतीय स्टेट बँकेवर चोरट्यांचा दरोडा | Batmi Express

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Crime,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Crime News,

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur Crime,Chandrapur   News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Crime News,

चंद्रपूर:-
 चंद्रपूर मार्गावरील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत दरोडा पडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दरोडेखोरांनी बँकेतील आलमारीचे लॉकर फोडून तब्बल १४ लाखांची रोकड लांबवल्याची माहिती आहे. या घटनेने शहरात मोठी खडबड उडाली आहे.

चंद्रपूर एमआयडीसी मार्गावर स्टेट बॅंक ऑफ इंडियाची शाखा आहे. ही शाखा पडोली पोलिस ठाण्यातंर्गत येते. शनिवार व रविवार अशा सलग दोन दिवस बॅंकेला सुट्ट्या असल्याने ही बँक बंद होती. हीच बाब हेरुन दरोडेखोरांनी शनिवारी किंवा रविवारच्या मध्यरात्री बॅंक फोडून बॅंकेत प्रवेश केला. बँकेतील आलमारीचे लॉकर तोडत चोरांनी त्यामध्ये ठेवलेली जवळपास १४ लाखांची रोकड पळवली.

सोमवारी सकाळी बँक उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. लगेच नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार व त्यांच्या चमूने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. परंतु, अद्यापही काही समोर आले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.