नागभीड: तालुक्यातील विलम मसली या गावातील शेतकरी आपल्या शेतात सायंकाळच्या सुमारास काम करण्यासाठी गेला असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढवून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव किशोर दाजी वाघमारे असे आहे.
नागभीड तालुक्यातील चौथी घटना आहे असं सांगण्यात येत आहे. गावातील व आजूबाजूच्या परिसरातील जनतेने नार भक्षक वाघांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी शासनाकडे मागणी केली आहे, लोकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वन विभागाने जंगलात जाऊ नये, असे आवाहन जनतेला केले आहे.
Nagbhid: An incident has come to light when a farmer of Vilam Msli village in the taluk was going to work in his field in the evening when a striped tiger suddenly attacked him and killed him. The name of the deceased is Kishore Daji Waghmare.
It is said that this is the fourth incident in Nagbhid taluka. The people of the village and surrounding areas have demanded the government to get rid of the tigers as soon as possible, an atmosphere of fear has been created among the people. Also, the forest department has appealed to the public not to go into the forest.