आष्टी : चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथील दहावीमध्ये शिकणाऱ्या एक तरुणीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताचे दरम्यान घडली. कौशीस समीर बहादूर असे नाव आहे.
कौशीस ही तिच्या आजोबाकडे राहत होती. आजोबा दुकानात गेले तेवढ्या वेळात ती घरात गेली. दरवाजाची आतून कडी लावून पंख्याला गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा. कौशीस ही बाहेर दिसत नसल्याने आजोबा आले. घरात जाऊन दार ढकलले तर आतमधून लावून असल्याचे दिसून आले. शेजाऱ्यांनी दार काढून तिला फासावरून उतरवले. तिला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मयत तरुणी ही येणापूर येथील इंदिरा गांधी इयत्ता दहावीमध्ये हायस्कूलमध्ये शिकत होती.
२ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार होती. ती अभ्यासात हुशार होती, असे शिक्षकांनी सांगितले, तिचे वडील मुंबई येथे नोकरीसाठी गेले होते. तिला एक लहान बहीण व भाऊ आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात
घटनेचा तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण कळले नाही.