शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मातापालक व सखी सावित्री समितीचा सहभाग व तिळसंक्राती निमीत्य शैक्षणिक स्पर्धात्मक कार्यक्रम | BatmiExpress™

Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli Batmya,
Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची- तालुक्यातील बोटेकसा केंद्रातील अतिदुर्गम अशा जि.प.शा. कैमुल येथे दिनांक 17 जानेवारीला तिळसंक्राती निमीत्त सातवी शिक्षण परिषद माता पालक व सखी सावित्री समिती च्या वतीने तिळसंक्रातीचे औचित्य साधुन हळदीकुंकूचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
    या शिक्षण परिषदेला उद्घाटक विनोद मेश्राम कैमुल हे होते. अध्यक्ष मडावी सर मु.अ.हितापाडी, संयोजक किशोर बावणे केंद्रप्रमुख तर विशेष अतिथी म्हणुन चापले सर गशिअ देसाईगंज तसेच श्री.कोटगले सर, मेश्राम, लिंगायत, सुभाष गहाने सुलभक कोरची हे होते. शिक्षण परिषदेची सुरूवात सरस्वती माता व सावित्रीबाई फुले प्रतिमा  पुजनाने करण्यात आली. कैमुल शाळेतील मुलांनी फुलोरा परिपाठ सादर केला .
    सातव्या शिक्षण परिषदेच्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या फुलोरा या शैक्षणिक उपक्रमाच्या व मुलभुत साक्षरता, संख्याज्ञान या निपुन भारताच्या अंमलबजावणीसाठी व माता पालक संघाच्या पायाभुत बैठकीबाबत  शिक्षण परिषदेच्या मासिक आयोजनातुन  आपले ज्ञान अद्यावत राहण्याकरिता व येणाऱ्या स्पर्धात्मक चौथी, सातवीच्या  शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय  परिक्षेत केंद्रातील विद्यार्थी  उच्च स्तरावर राहण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे व केंद्रातील 3 ते 10 विध्यार्थ्यांचा स्तर वाढविण्यासाठी विषयानुसार अध्ययन निष्पत्ती बाबत  शिक्षकांनी प्रत्याभरण करावे. असे मार्गदर्शन प्रास्ताविकेतून केंद्रप्रमुख बोटेकसा यांनी केले. विध्यार्थी, शाळा, शिक्षकांना शैक्षणीक मदत  करणाऱ्या कैमुल गावातील माता पालक अध्यक्षा, सखी मंच अध्यक्षा, सदस्या व केंद्रातील सर्व महिला शिक्षिका यांनी  तिळसंक्रातीच्या निमीत्त माता पालक व सखी सावित्री  कैमूल गावच्या महिला यांनी हळदीकुंकवाचा कार्यक्रम उत्सा‌हपुर्ण व आंनदाने साजरा केला. शैक्षणिक स्तर अधिक जलदगतिने होण्यासाठी केंद्रातील शिक्षकांनी शिक्षण परिषदेत दिवसभरात शैक्षणिक विषयावर  सुलभन केले. सुत्रसंचालन श्री.नगरकर सर मु.अ.कैमुल यांनी केले तर आभार सलामे सर खुर्शीपार सर  यांनी मानले. 
 शिक्षण परिषदेच्या  यशस्वीतेसाठी कु.गायकवाड, बुद्धे मु.अ. शिक्षिका कैमुल, सौ.मेघा बुराडे शिक्षिका, तेलाशी, मेश्राम व केंद्रातील 
 शिक्षकांनी सहयोग केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.