गडचिरोली, 4 जानेवारी : सकाळच्या सुमारास विनयभंग करणाऱ्या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी 3 वर्ष कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गणेश मनोहर म्हशाखेत्री (34) रा. कुरुड ता. चामोर्शी असे आरोपीचे आहे.
जानेवारी ०५, २०२३
0
आरोपी हा 3 ऑगस्ट 2020 रोजी सकाळच्या सुमारास पीडितेवर अत्याचार केल्याने पीडितेने याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन चामोर्शी येथे दाखल केली असता अप.क्र. 471/2020 कलम 376 (1),511,450, 354, 354 (अ), 354 (ब), 324 भादवी अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला. दरम्यान पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून आज बुधवार 4 जानेवारी 2023 रोजी आरोपी गणेश मनोहर म्हशाखेत्री याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी कलम 354 (ब) भादवी मध्ये 3 वर्ष कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच कलम 324 भादवी मध्ये 1 वर्ष कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच कलम 451 भादवी मध्ये 1 वर्ष कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. वरील रखमेतून पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून 15 हजार रुपये देण्याचे आदेश पारीत करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास मपोउपनि / निशा खोब्रागडे, पोस्टे चामोर्शी यांनी केला तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी । अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.