'

CoronaVirus Live Updates: भारतात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू | Batmi Express

0
Coronavirus Live Updates,Delhi,COVID19India,Covid-19,Coronavirus Live,CoronavirusIndia,News India,coronavirus,CoronaUpdatesInIndia,India’s Fight Against COVID-19,

CoronaVirus Live Updates: कोरोना परतला आहे आणि तो इतक्या घातक रुपात परतलाय की सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. दरम्यान, दिल्लीत अनेक महिन्यानंतर कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोनाची लाट आलेली असताना दिल्लीत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. एकूण 27 रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत दिल्लीतील कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे. 
वाढता कोरोनाचा मुकाबला कसा करायचा त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची बैठक बोलवली. या बैठकीत उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मास्क घातला आहे.

भविष्यात काय वाढून ठेवले, याचा अंदाज यावरुन लावता येईल. देशात मास्कसक्ती पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना अजून संपलेला नाही, असे सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
कोरोनाचे पुन्हा निर्माण झालेले संकट पाहता चौथा डोसही घ्यावा लागू शकतो अशी शक्यता एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली. पण या संदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही. हेट्रोव्हॅक्सिनमुळे सकारात्मक परिणाम दिसल्याचे ते म्हणाले. लसीकरणामुळे व्हायरसच्या विरोधात शरीर आणखी मजबुतीने लढा देते. त्यामुळे कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे असे रणदीप गुलेरिया यांनी म्हटले. 
राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारला सावधानतेचा इशारा दिला आहे. चीनमध्ये वेगाने कोरोना वाढत असल्याने आपल्या राज्यात कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. कोव्हिड केअर, आरोग्य सुविधा अलर्ट करायला हव्यात, असे टोपे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे कोरोना संकट घोंघावत असल्यामुळे गर्दीची ठिकाणे टाळा असे जेजेच्या डीन डॉ पल्लवी सापळेंनी म्हटले आहे. लक्षणे दिसल्यास चाचणी करा, तसेच ब्लड शुगर लेव्हलही चेक करा असे सापळे म्हणाल्या. देशातली स्थिती नियंत्रणात असली तरी गाफील राहण्यात अर्थ नाही असा इशारा त्यांनी दिला.
अमेरिका, चीन, जपानमध्ये कोरोना पुन्हा फैलावतोय. देशावर पुन्हा कोरोनाचे संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी आज महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्याआधी आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती, कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली, लॉकडाऊन, टेस्टींग वाढवणे, रूग्णालयांची स्थिती इत्यादी बाबींवर या बैठकीत चर्चा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×