एजाज पठाण, मालेवाडा: मालेवाडा तें मुरूमगांव ला जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. 1 महिन्यात या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र रस्त्याच्या कामात डांबराचे प्रमाण अत्यल्प असून रस्त्यावर टाकण्यात आल्याच्या भराची दबाई करण्यात आली पण रस्ता उखडायला सुरूवात झाली असल्याचा आरोप मुरूमगांव आणि मांगेवाडा येथील रहिवाशांचा आहे.
मालेवाडा पासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर मुरूमगांव आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण मुरूमगांव येथिल रस्त्याचे काम निकृस्ट दर्जाचे डांबरीकरण उखडायला सुरवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडचण निर्माण तर अपघाताला आमंत्रण होईल.
तरी प्रशासनाने याची त्वरीत दखल घेवुन सदर ठेकेदार यांच्या वर उचित कारवाही करावी. अशी मागणी मुरूमगांव आणि मांगेवाडा येथील जनते कडून होत आहे.