'

त्रिवेणी गायकवाड आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित | Batmi Express

0

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli Curfew New Guideline News,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची
:-  गडचिरोली जिल्ह्यातील सन 2022 -23 जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व दोन जिल्हा परिषद हायस्कूल शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरची तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभळी येथील कार्यरत शिक्षिका त्रिवेणी गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. 

        या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य विनीत मत्ते , माध्यमिक शिक्षण अधिकारी राजकुमार निकम , प्राथमिक शिक्षणाधिकारी विवेक नाकाडे व सर्व जिल्ह्यातील गटशिक्षणअधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×