गडचिरोली :- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार तसेच जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आरोपी युवकाला अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलिसांनी बुधवारला अटक केली. आरोपीविरुद्ध 376, पोस्को व अॅट्रासिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेणू माधव ठाकरे (19) रा. छल्लेवाडा ता. अहेरी असे आरोपीचे नाव असून त्याला गुरुवार, 1 डिसेंबरला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी युवक वेणू ठाकरे याने एका अनुसूचित जातीच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. जुलै 2021 पर्यंत अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवले. त्यानंतर पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करुन लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी पीडितेने रेपनपल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वेणू ठाकरे याच्याविरुद्ध कलम 376, पोस्को व अॅट्रासिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली..
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.