'

१० वर्षीय विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या | Batmi Express

0
Nanded,Nanded News,Nanded Live,Nanded Marathi News,suicide,

नांदेड : इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या १० वर्ष वयाच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. आदिवासी आश्रम शाळेतील मुलींच्या वसतिगृहात हा प्रकार घडला आहे.

विश्रांती देशमुखे ही हदगाव तालुक्यातील केदारगुढा येथील आदिवासी आश्रम शाळेत शिकत होती. १२ डिसेंबरला सायंकाळी ५ च्या सुमारास तिने वसतिगृहातील आपल्या दुमजली बेडवरच्या लोखंडी रॉडला ओढणी बांधून आत्महत्या केली. तिने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. अवघ्या १० वर्षाच्या मुलीने अशाप्रकारे गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मात्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी आश्रम शाळेतील चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना काल नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत घडली. दरम्यान त्या मुलीने का आत्महत्या केली याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही. या घटनेमुळे वसतिगृह परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. ही विद्यार्थिनी आश्रमशाळेत शिकत होती. मात्र काल अचानक तिने आत्महत्या केली.

मृत तरुणीच्या दोन बहिणी याच आश्रम शाळेत शिकण घेत आहेत. शाळेतून आश्रमाच्या खोलीत आले, असताना खोलीचा दरवाजा बंद होता. आवाज देऊन ही तरुणी दरवाजा उघडत नसल्याने व्यवस्थापनाने दरवाजा तोडन्याचा निर्णय घेतला. दरवाजा तोडला असता तरुणीने पलंगला दोरी लावून गळफास घेतल्याचेही निदर्शनास आले.

आत्महत्या नेमके कोणत्या कारणासाठी केली. याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×