'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! पती समोरच केला पत्नीवर चक्क बलात्कार | Batmi Express

0
Jalgaon,Jalgaon Live,Jalgaon News,Jalgaon Marathi News,Jalgaon Today,Maharashtra,Crime,crime news,rape,Rape News,

जळगाव:- पती सोबत असला की महिला स्वतःला सुरक्षित समजतात. पण पती समोर एखादा इसम महिलेच्या अब्रूवर हात घालत असेल आणि पती मुकाट्याने ते पाहत असेल तर महिलेच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार न केलेलाच बरा. लाजेने मान खाली करायला लावणारी घटना जळगाव शहरात घडली आहे.येथे एक इसम महिलेच्या घरी यायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. या दरम्यान महिलेचा पती घराबाहेर निघून जात होता. नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने पती आणि त्याच्या मित्रा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, २६ जुलै २०२२ रोजी माजलगाव तालुक्यातील एका विवाहित महिलेच्या घरात बाशेद इनामदार नामक व्यक्ती घुसला व त्या महिलेसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्याची मागणी करू लागला. हा सर्व प्रकार महिलेच्या पतीसमोर घडत होता. दरम्यान महिला आरडा ओरड करू लागली. त्यावेळी बाशेद इनामदार याने आरडा ओरड केलीस तर तुझ्या मुलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली व महिलेवर जबरदस्ती अत्याचार केला.

हा प्रकार अनेक दिवस घडत होता. दरम्यान यावेळी विवाहितेचा पती नासेर शेख हा घरातून निघून जात होता. बाशेद इनामदार हा पीडित महिलेच्या मनाविरुद्ध राजरोस अत्याचार करत असे. दरम्यान पीडित महिलेने या अन्यायाला प्रत्यक्ष ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत २ नोव्हेंबर २०२२ रोजी वाचा फोडली. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×