'
30 seconds remaining
Skip Ad >

वडसा: विद्यार्थ्यांच्या स्कूलबसला कारची जबर धडक; पाच गंभीर जखमीं तर १३ मुले जखमी | Batmi Express

0

wadsa,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli,Gadchiroli Accident News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,

वडसा:- गडचिरोलीः- देसाईगंज (Desaiganj) येथील किड्स होम कॉन्व्हेंट तसेच यशोदादेवी इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांना (students) कुरूड या ठिकाणी पोहोचवून देण्यासाठी निघालेल्या चारचाकी वाहनाला (टाटा मॅजिक) समोरून येणाऱ्या कारने जबर धडक दिली.

यात १३ मुले जखमी झाली. पाच गंभीर जखमींना उपचारासाठी ब्रम्हपुरी (Bramhapuri) येथे नेण्यात आले. हा अपघात बुधवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडला.

वनविभागाचे कार्यालय ते सिंध भवनादरम्यान असलेल्या वळणावर हा अपघात घडला. मुलांना घेऊन जाणारे वाहन (एमएच ३५, पी २२५८) देसाईगंजकडून कुरूडच्या दिशेने जात होते. त्याचवेळी आरमोरीकडून येणाऱ्या भरधाव कारने (सीजी ०४, एमबी ८४८०) मुलांच्या वाहनाला जबरदस्त धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात १३ मुलांना दुखापत झाली. सर्व जखमींना आधी देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शाळा (School) सुटल्यानंतर ही मुले नेहमीच्या वाहनाने कुरूडकडे निघाले असताना हा अपघात घडला. यात मुलांच्या वाहनाच्या समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. धडक देणाऱ्या कारच्या दोन्ही एअर बॅग बाहेर आल्या. यावरून धडक किती जबरदस्त होती हे लक्षात येते. किरकोळ जखमींना उपचारानंतर सुटी देण्यात आली, तर पाच जणांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीला हलविण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर पालकांनी मोठी गर्दी केली होती. मुलांना घेऊन जाणाऱ्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक जणांना बसविले जाते. याकडेही पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. अधिक तपास देसाईगंज पोलिस करीत आहे.

हे विद्यार्थी झाले जखमी

या अपघातात सौम्या बोरकर (आठ वर्ष), श्रीती भूषण कराळे (सात वर्ष), धनश्री विजय पारधी (१४ वर्ष), गुंजन रामचंद्र पारधी (१४ वर्ष), आफरिना जगदीश निहाटे (सात वर्ष), चैतन्य रोहन नंदनवार (१० वर्ष), अथर्व हिरालाल निमजे (आठ वर्ष), राधा अतुल फटिंग (१० वर्ष), खुशबू ईश्वर निहाटे (नऊ वर्ष), गुंजन अतुल फटींग (१२ वर्ष) या विद्यार्थ्यांसह शाहरुख अकबरखा पठाण (२९ वर्ष), सत्यवती मनोज परागकर (४५ वर्ष) हे जखमी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×