तालुका:कुरखेडा -
मालेवाडा वार्ताहर (एजाज पठाण ) : मालेवाडा येथील आविका सोसायटी केंद्राचे उदघाटन हे गेल्या 12/13 दिवसा पुर्विच झाले परंतु अद्यापही धान खरेदी करणे सुरू झाले नाही.हलक्या व जड धानाची कापणी व मळणी होऊन 20 ते 25 दिवस लोटत असतांना अद्दापही शासकीय आधारभुत हमीभाव केंद्र सुरू झालेले नाही.अलीकडे योग्य हमीभावामुळे शेतकय्रांचा धान विक्रीचा कल हा आधारभुत धान केंद्रावर असुन अद्दापही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू नाही. मालेवाड्याचे उदघाटन करून सुद्धा मालेवाडा येथील आविका सोसायटी मध्ये धान खरेदी करणे सुरू झाले नाही.त्यामुळे मालेवाडा व परीसरातील शेतकय्रांची मोठी डोके दुखी व आर्थिक पिळवणूक होत आहे.या वर्षी शासनाने धानाला प्रती क्विंटल 2040 रुपये हमीभाव जाहीर केल्या मुळे सोबतच बोनस मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी आहे.परंतु गरजेपोटी शेतकय्रांनी व्यापाय्रांना कमी दराने धानाची विक्री सुरू केलेली दीसत आहे.
खरीप हंगामाला आक्टोंबरच्या शेवटी शेवटी सुरूवात झाली पण अजुनही आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू झाले नाही, त्यामुळे शेतकय्रांना कमी व पडत्या भावाने आपले धान्य खाजगी व्यापाय्रांना विकावे लागत आहे.त्यामुळे शासनाकडुन शेतकय्रांची अर्थीक पिळवनुक व फसवनुक होतांनी दीसत आहे,तेव्हा शासनाने मालेवाडा येथील आधारभुत हमीभाव धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करावी आणि त्याच बरोबर शेतकय्रांना बोनस सुद्धा जाहीर करावा अशी मागणी मालेवाडा येथील आविका सोसायटीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. सुभाष गुंडरे यांनी वर्तमान पत्रातुन शासनास केलेली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.