धक्कादायक : स्वतःच्या १४ महिन्याच्या मुलीला रेल्वेत सोडून रचला अपहरणाचा कट | Batmi Express

Be
0

Nagpur LIve,nagpur news,Nagpur,crime Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Crime,

नागपूर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता क्राईम सिटी मानल्या जाणाऱ्या नागपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वतःच्या 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

कृष्णकुमार राजकुमार कोसले या आरोपीने हा प्रताप केला आहे. त्याने केलेली ही बनवाबनवी पोलीस तपासात उघड झाली आहे. त्याने नागपूर रेल्वे स्थानकावर आईचे लक्ष नसताना मुलीला जबलपूर-अमरावती एक्सप्रेसमध्ये बसवले. यानंतर आरोपी पत्नीसह चेन्नई-रायपूर प्रवास करत होता.

त्याने नागपूर रेल्वे स्थानकावर थांबला असता आपल्या अपहरणाचा कट रचला. पोलीस तपासात त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू आहे.

नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी शांती नगर पोलीस स्टेशन हद्दीत 73 लाख रुपयांची चोरी झाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. व्यसनाधीन असलेल्या एका 28 वर्षीय तरुणानेच ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर जावेद थारा असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. तर वाजीद वल्द गफ्फुर अली असे सहकऱ्याचे नाव आहे. या दोघांना एकूण 13 लाख रुपये रोख आणि सोन्याच्या दागिन्यांसह 60 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. पोलिसांनी अखेर चौकशी अंती या दोघांकडून हा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेत मुलासह आणखी एका सहकऱ्याला अटक केली आहे. इलेक्ट्रॉनिक लोकर तोडणारा एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->