वैरागड - पाठणवाडा दरम्यान मुख्य रस्त्यावरील झुडुपात आढळला अज्ञात वृद्ध व्यक्तीचा प्रेत | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli Crime,Gadchiroli live,Armori,Armori Crime,Armori Live,

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli Crime,Gadchiroli live,Armori,Armori Crime,Armori Live,

वैरागड
: – येथून ०२ कि. मी. पाठणवाडा मुख्य रस्त्या लगत अनेक दिवसापासून पडून असलेला अज्ञात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला मृत्यू झाल्या नंतरच त्या वृद्धाची चौकशी सुरु झाली. वैरागड-पाठणवाडा दरम्यान मुख्य रस्त्यावरील झुडुपात अनेक दिवसापासून अज्ञात वृद्ध जर्जर व्यक्ती असल्याचे नागरिकांना निदर्शनात आले. त्या व्यक्तीला नागरिकांनी विचारपूस करून जेवण-पाणी देत होते. त्या व्यक्तीला आपला पत्ता माहीत नसल्याने नागरिकांनी पाठणवाडा येथील पोलिस पाटील परसराम कुमारे यांना माहिती दिली. माहिती देऊनही त्या व्यक्तीवर कोणतेही उपचार झाले नाही. अखेर दि. १५ नोव्हे. रोजी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.

त्या अज्ञात मृत वृद्धाची माहिती नागरिकांनी वैरागड येथील पोलिस पाटील गोरखनाथ भानारकर यांना दिली. पोलिस पाटील भानारकर यांनी आरमोरी पोलिस स्टेशन येथे माहिती कळविली. आज दि. १६ नोव्हे. रोजी सकाळी आरमोरी पोलिस घटनास्थळी पोहचून पंचनामा केले. आणि उत्तर तपासणीसाठी आरमोरी उप जिल्हा रुग्णालय येथे प्रेत पाठविण्यात आले

पुढील तपास आरमोरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक झिंगझुर्डे, हवालदार रासेकर आणि पोलिस शिपाई पोयाम करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.