ब्रम्हपुरीच्या बफर झोनमध्ये पाच वाघ स्थलांतरित करणार : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार | Batmi Express

Be
0

Bramhapuri,Bramhapuri Live,Nagpur,nagpur news,Chandrapur,Chandrapur News,

नागपूर :
ब्रम्हपुरीच्या बफर झोनमध्ये पाच वाघ स्थलांतरित केले जाणार आहे. एनटीसीए ने त्याला मान्यता दिली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिली. ते सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, दोन वाघांना आपण जेरबंद केले असून तीन बिबट्याला जेरबंद केले. दोन वर्षांचे आकडे बघितल्यास वाघांची ५०० वर पोहचली आहे. त्यासोबतच मानव वन्यजीव संघर्ष देखील वाढला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जात असून त्यात वाढ करण्याचा निर्णय घेणार आहोत.
नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग) मार्फत मुंबई महापालिकेत (महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात) झालेल्या १२ हजार कोटींच्या कामांची चौकशी केली जाणार आहे.

याबाबत विचारणा करण्यात आली होती. कॅग ऑडिट होत असते आणि मागणी केल्यानंतर ते अधिक गतीने होईल. अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला असेल तर तो उघडकीस येईल, असेही मुनंगटीवार म्हणाले.
कोणत्याही पुराव्याअभावी, कागदाअभावी गुजरातला प्रकल्प पळवल्याचा आरोप केला जात आहे. त्यासंबंधित एखादा तरी कागद दाखवा की जो प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता आणि तो गुजरातला गेला. कुठलेही तथ्य नसताना आरोप केले जात आहेत, म्हणून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला जात नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->