तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Accident: नागपूर महामार्गावर दुचाकीस्वारांचा अपघात; एक जागीच ठार | Batmi Express

Chandrapur,Chandrapur Accident,Bhadrawati,Chandrapur Accident News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News,Chandrapur Today,

Chandrapur,Chandrapur Accident,Bhadrawati,Chandrapur Accident News,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News,Chandrapur Today,

भद्रावती
:- नागपूर महामार्गावर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दुचाकीला स्कार्पिओची जबर धडक होवून हा अपघात झाला. ही घटना रविवारी (दि. १३) सकाळी साडेअकराच्या सुमारास नागपूर महामार्गावर भद्रावती शहरातील पॉवर ग्रीड जवळ घडली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शंकर धोंडू निकुरे (वय ५०, रा. जळका ता. वरोरा) आणि कार्तिक वसंत मोहुर्ले (दि. २४, रा. खरवड ता. वरोरा) हे दोघेजण पाहुण्यांकडे जात होते. रविवारी सकाळी दुचाकीने (क्र. एम.एच.३४ बी.डब्ल्यू. ३४४९) चंद्रपूरला जात होते. दरम्यान, भद्रावतीच्या पॉवरग्रीड जवळ येताच मोहबाळा येथील वळणावर असताना चारचाकीने (क्र. एम.एच.०५ सी. एम. १५१४) दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील मागे बसलेले शंकर निकुरे हे जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक कार्तिक मोहुर्ले हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटेनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन जखमीला रुग्णालयात हलविले. तर मृतास शवविच्छेदनाकरिता येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.

अपघातातील चारचाकी तालुक्यातील चालबर्डी येथील असून सूरज ढाकणे यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.