आष्टी : चामोर्शी तालुक्यातील ईल्लूर येथील एका तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज १४ नोव्हेंबरला सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली. मृतक तरुणीचे नाव सुप्रिया सुभाष कुबळे (१६) रा.ईल्लूर असे आहे.
सदर तरुणी सकाळी पाणी आणण्यासाठी अशोक पातर यांच्या घराजवळ असलेल्या शासकीय विहीवर गेली होती. ती पाणी काढत असतांना विहिरीत कोसळली तेव्हा विहीरी जवळ असलेल्या लोकांना आवाज आल्याने त्याठिकाणी धाव घेऊन त्या तरुणीला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र प्रयत्न करुनही यश आले नाही. शेवटी तीचा मृतदेह बाहेर काढावे लागले. सुप्रिया ही महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आष्टी येथील माजी विद्यार्थीनी तसेच धनुर्विद्या सेंटरची खेळाडू होती.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.