ब्रम्हपुरी: अखेर... दोन दिवसापासून वैनगंगा नदी पात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह मिळाला.! | Batmi Express

Bramhapuri,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri Live,Chandrapur News LiveChandrapur Today,Bramhapuri News,Drowned,
Bramhapuri,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri Live,Chandrapur News LiveChandrapur Today,Bramhapuri News,Drowned,

ब्रम्हपुरी:-तालुक्यातील दक्षिण परिसरात असलेल्या आवळगाव येथील युवकाचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक:-१८/११/२०२२ रोजी ३:३० च्या दरम्यान उघडकिस आली.
 देवानंद वामन कोटनाक वय वर्षे २२ आवळगाव येथील रहिवाशी असे मृतक युवकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्तांत असे आहे की दिनांक:-१६/११/२०२२ ला देवानंद हा वैनगंगा नदी तीरावर असलेल्या चीचगाव (डोर्ली) व आवळगाव त्रिवेनी संगम नदी तिराच्या मध्यभागी शेतामध्ये सहभोजन करण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. देवानंद हा घर बांधकामाचे काम करण्यासाठी जात होता. घर बांधकामाला जात असलेल्या गावातील मित्र यांनी मिळून सहभोजन करण्याचा निर्णय घेतला. मित्राच्याच शेतामध्ये  देवानंद व काही मित्र भोजन बनवायला सुरूवात केली.भोजन बनवून झाल्याने देवानंद व सर्व मित्रांनी सह भोजनाचा आस्वाद घेतला.देवानंदनी सहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर हात धुवायला अगदी लागून असलेल्या वैनगंगा नदी तीरावर गेला असता नदीपात्रात तोल गेल्याने  नदीपात्रात लुप्त झाला. 

माञ सोबत असलेल्या मित्रांना मनात थोडी शंका निर्माण झाली की देवानंद हात धुवून  अजूनही का आला नाही..? म्हणुन सर्व मित्रांनी नदीकडे धाव धाव घेतली. माञ देवानंदचा काहीच शोध लागत नाही. बरेचदा सर्वांनी देवानंद ला आवाज मारला माञ देवानंदचा आवाज येत नव्हता. लगेच गावात व नदी तीरावर असलेल्या लोकांनी काही मित्रांनी धाव घेतली व घटनेची आपबिती सांगितले. लगेच काही लोकांनी घटना स्थळाकडे धाव घेतली व देवानंदचा इतरत्र शोध घेतला माञ देवानंद चा थांगपत्ता लागेना. ही माहिती मेंडकी पोलिस चौकीला देण्यात आली. मेंडकी पोलिस चौकीतील काही अधिकारी व कर्मचारी यानी घटना स्थळाकडे धाव घेतली व पाणबुड्याच्या साह्याने शोध घेतला माञ देवानंदचा शोध लागला नाही.१६/११/२०२२चा दिवस असाच निघुन गेला. परत दिनांक:१७/११/२०२२ ला सकाळ पासुन शोधमोहीम घेण्यासाठी बोटी बोलाविण्यात आली.  सलग दोन दिवसांच्या शोधमोहिमे नंतर पोलिसांना दिनांक १८/११/२०२ ला ३:३०  वाजता च्या दरम्यान देवानंदचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळाला. लगेच मृतदेह पाण्याबाहेर काढूण उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात येणार असल्याचे प्राप्त माहिती आहे.
देवांनंदच्या पच्छात्य कुटुंबात तिन जण असुन घरचा लाडका एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देवानंद हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा मुलगा होता त्याच्या जाण्याने आवळगाव परिसर शोकसागरात बुडालेला आहे.
घटनेचा पुढील तपास संबधीत पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.