ब्रम्हपुरी: वाघाचा हल्यात महिला जागीच ठार | Batmi Express

Bramhapuri Tiger Attack,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri,Chandrapur Live,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Tiger Attack,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

ब्रम्हपुरी
:- ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील शेताशिवरात आज दि.20/10/2022 दुपारी 2 वाजता सौ. रुपाली रामचंद्र म्हस्के (वय 40)  रा.हळदा ही महिला आपल्याच शेतामध्ये काम करत असताना या  महिलेवर धानात बसून असलेला वाघाने हल्ला करून जागीच ठार केले.

सविस्तर वृत्त असे आहे की, रुपा हि स्वतःच्या शेतात जनावरांसाठी गवत कापायाला गेली शेत हे जंगलालगतं असल्याने बांधा आड दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने रूपा रामचंद्र म्हस्के वर हल्ला चढवून ठार केले.
मृतक महिलेच्या पश्चात ३ मुले आणि पती आहे असा आप्त परिवार आहे. रूपाच्या जाण्याने मस्के कुटुंबावर मोठ दुःखाच डोंगर कोसळले आहे. तसेच गाव परिसर शोकसागरात बुडालेला आहे.
संभाव्य नरभक्षक वाघाचे धोके लक्षात घेता संबधित वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी ग्रामस्थांनी व मस्के कुटुंबीयांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.