मालेवाडा (प्रतीनिधी एजाज पठाण): - ॲड विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा येथे वनपरिक्षेत्र कार्यालय मालेवाडा यांच्या वतीने आज दिनांक 6 ऑक्टोंबर 2022 ला वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख, प्रा.दिलीप नंदेश्वर होते प्रमुख अतिथी तथा प्रमुख मार्गदर्शक माननीय अजिंक्य भांबुरकर संचालक वन्य जमिनी संवर्धन संस्था नागपूर प्रमुख अतिथी माननीय डी.बी. बोरकर क्षेत्र सहाय्यक खोब्रामेंढा, विशेष अतिथी प्रा. युवराज राऊत हे उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक यांनी वन्यजीव चे संरक्षण कसे करता येईल, त्यांचे महत्त्व काय आहे. तसेच वाघ हा जंगलचा राजा आहे, त्याच्यापासून अनेक महत्त्व आहेत, त्याचप्रमाणे वनरक्षकांना अनेक मेहनत करावा लागतो.
यासंदर्भात सविस्तर माहिती प्रोजेक्टच्या माध्यमातून मार्गदर्शन केलें. सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा. भजन कन्नाके, प्रा. रामटेके,डॉ.पल्लवी काळे, डॉ. ठाकरे, प्रा. सौ. बावांथडे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच मालेवाडा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक यांचा समूह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आत्राम यांनी तर सूत्रसंचालन प्रा. प्रमोद कुमरे यांनी केले व आभार प्रा. रुपेश लोहमबरे यांनी मानले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.