वैनगंगा नदीत स्कॉर्पियो वाहन कोसळली | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Gondpipari,

Chandrapur,Chandrapur News,Gondpipari,

आष्टी
: गोंडपिपरी वरून आष्टिकडे जात असताना आष्टि जवळील वैनगंगा नदी पात्रात अनियंत्रित होऊन चक्क स्कॉर्पियो वाहन कोसळले असल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर हद्दीत घडली आहे.स्कॉर्पियो वाहणात 7 जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती कळताच तहसीलदार के. डी. मेश्राम आणि गोंडपिपरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नदी पात्रात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वाहन आणि त्यात असणारे प्रवाशी याबाबत अजून पर्यंत माहीती कळू शकली नाही. पोकलांड मशीनच्या मदतीने प्रवाशी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.