आरमोरी: वाघाच्या हल्ल्यात देशपूर येथील इसम ठार | Batmi Express

Armori Tiger Attack,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Armori Live,Tiger Attack,Gadchiroli Batmya,Armori,Armori News,

Armori Tiger Attack,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Armori Live,Tiger Attack,Gadchiroli Batmya,Armori,Armori News,



आरमोरी
(देशपूर): - प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील देशपूर (कूरंजा) येथे वाघाच्या हल्ल्यात ठेमाजी माधव आत्राम ठार झाल्याची घटना आज अंदाजे एक वाजताच्या दरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे आहे की, देशपूर येथील रहिवासी असलेल्या ठेमाजी माधव आत्राम वय 58 वर्ष हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गुरे चारण्यासाठी देलोडा बीट क्रं. न. 10 जंगलामध्ये गेले होते. गुरे चारत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून काही अंतरावर फरकडत नेऊन त्यांना ठार केले.

या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळाली असता घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.


तसेच या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली असता पोर्ला रेंज वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी असल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.