चंद्रपूर (सिंदेवाही): शेत जमिनीच्या वादातून मुलीनेच केली आईची निर्घृण हत्या | Batmi Express

Be
0

Sindewahi,Sindewahi News,Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur News,murder,Murdered,

सिंदेवाही : तालुक्यातील नलेश्वर येथील रहिवासी तानाबाई महादेव सावसाकडे (65) यांची 3 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री हत्या झालेली असून तिचे अंत्यविधी गावातील स्मशानभूमीत करण्यात आलेले आहे. ती हत्या घरातीलच व्यक्तींनी केलेली असल्याची तक्रार मृत महिलेची मुलगी रंजना रामेश्वर सोनवणे हिने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे येऊन दिली.

अशा प्रकारची तक्रार प्राप्त होताच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे यांनी पिएसआय महल्ले, पीएसआय ढोके, हेड कॉन्सस्टेबल सोनुले, पोलीस कॉन्सस्टेबल ढोकळे, रहाटे, श्रीरामे, मदारे, मातेरे असे  पोलीस पथकासह घटनास्थळी रवाना झाले.  

Sindewahi,Sindewahi News,Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur News,murder,Murdered,

नलेश्वर या गावातून मृत महिलेची मुलगी वंदना खाते व सून चंद्रकला सावसाकडे यांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले. आणि कसुन चौकशी करण्यात आली.

मृत महिलेची मुलगी वंदना खाते हिने तिच्या आईला 3 ऑक्टोबर 2022 रोजी शेत जमिनीच्या वादावरून झालेल्या भांडणामध्ये वंदना व तिची वहिनी चंद्रकला या दोघींनी मिळून आईचे नाक व तोंड दाबून क्रूर पणे तिला ठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गावात कोणालाही माहिती पडू न देता तिचे अंत्यविधी गावाचे बाहेर जमिनीमध्ये पुरून उरकण्यात आले असल्याची कबुली दिली. 

सदर प्रकरणांमध्ये कलम 302, 201, 506, 34 भा. द. वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश घारे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->