चंद्रपूर : येथील चंद्रपूर - गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील महात्मा फुले चौक समोर चंद्रपूर वरुन गडचिरोलीकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याने झालेल्या अपघातात आजी-नातू चा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. बबलु उर्फ देवानंद दादाची किन्हेकार (28) व लक्ष्मीबाई आनंदराव किन्हेकार (78) रा. साखरी असे अपघातातील मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आजी नातू हे आपल्या नातेवाईकाला भेटून स्वगावाकडे एमएच 34 बिके 0145 क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना एमएच 49 1127 क्रमांकाच्या भरधाव ट्रक ने त्यांना चिरडले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सावली चे ठाणेदार आशिष बोरकर हे त्वरित घटनास्थळी आपली चम्मु घेऊन दाखल होत अपघातातील दोघांना पोलीस वाहनाने सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताची माहिती परीसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी करण्यात आली होती. अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला असल्याची माहिती असून या पुढील तपास सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर करीत आहेत.