वडसा:- सध्या सुरू असलेल्या लहान मुलांना पळवुन नेणारी टोळीतील एक सदस्य पोलीस स्टेशन वडसा येथे अटक केली आहे अशी चर्चा सुरू आहे तरी ही एक अफवा असून अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती पोलीस स्टेशनला अटक नसुन सदर व्यक्ती हा मतीमंद भिकारी असुन त्याचे कडुन लहान मुलांना पळवुन नेण्याबाबत कोणतीही घटना घडलेली नाही.
- अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये.
- लहान मुलांना पळवुन नेण्याची घटना पोस्टे हद्दित व गडचिरोली जिल्हयात कोठेही घडलेली नाही.
- संशयीत ईसम आहे असे म्हणुन शहनिशा न करता मारहान करणे कायद्याने गुन्हा आहे.
- तसेच सर्व शाळा व कॉलेज त्यांचे मुख्याध्यापक व पालक यांना कळविण्यात येते की, सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास ठेवु नये.
- अशी कोणतीही संशयीत व्यक्ती मिळुन आल्यास तात्काळ पोलीस हेल्पलाईन क्रं. ११२ वर त्वरीत संपर्क साधावा.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.