'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिरोली (कोरची): बेडगांव ते कोसमी रोडवरती झालेल्या अज्ञान वाहनाच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू | Batmi Express

0

Gadchiroli Accident News,Korchi,Accident,Accident News,Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची (तालुका प्रतिनिधि )
: मुखालयापासुन ४ कि.मी.अंतरावर कोसमी ते बेडगांव राष्ट्रीय महामार्गावर (वाळदे बोडी) जवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विलास अमरू मडावी वय (२६ ) वर्ष राहणार कोसमी  या इसमाचा जागीच मृत्यू झाला. 

प्राप्त माहिती नुसार विलास मडावी हा इसम आपल्या मित्रा सोबत कोसमी येथून  जेवन करून बेडगांव येथे रात्रो कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या मित्रा सोबत गेला होता. कार्यक्रम पाहून वापस स्वगावी पायदळ येत असताना (  वाळदे बोडी )जवळ रोडवरती झोपुन असतांना कोरची मार्गाने चार चाकी वाहन भरधाव वेगाने येऊन त्याच्या अंगावरून गाडी गेली त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांची माहिती  बेडगांव पोलिस स्टेशनला दिली त्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर सकाळी कोरची येथे ग्रामीण रुग्णालयात नेवुन पी.ए.करण्यात आले.  नातेवाईकाडे  प्रेत देण्यात आले कोरची पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचा पुढील तपास ठाणेदार करीत आहेत.त्याच्या पश्चात पत्नी,मुलगी,आई,वडील,भाऊ, असा आप्तपरिवार आहे. तो मनमिळावू ,प्रेमळ होता. त्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केल्या जात आहे.  

कोसमी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×