'
30 seconds remaining
Skip Ad >

बिग ब्रेकिंग चंद्रपूर: लहान भावाने केला मोठ्या भावाचा व वहिनीचा खून! डब्बल मर्डरने सावली तालुका हादरला...

0

Sawali,Chandrapur,murder,Murdered,Sawali News,Sawali Murder,Crime,Chandrapur Crime Live,

सावली
:- मोठ्या भावासोबत जागेसाठी झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे घडली असून या घटनेने खळबळ माजली आहे.

सावली तालुक्यातील मनोहर निंबाजी गुरुनुले वय 62 वर्ष रा.गायडोंगरी, सौ. शारदा मनोहर गुरुनुले वय 50 गायडोंगरी यांचा जागेच्या वादात लहान भाऊ धनराज निंबाजी गुरुनुले वय 52 वर्ष यांच्या सोबत नेहमीच खटके उडायचे. यातून आज मोठ्या व लहान भावांमध्ये जोरदार झगडा झाला.त्यातच लहान भाऊ धनराज गुरुनुले यांनी आपल्या मोठा भाऊ मनोहर व वहीणी शारदा ला सब्बल ने मारहाण केली त्यात मनोहर गुरुनुले हा जागीच ठार झाला तर शारदा गुरुनुले हिला प्रथम सावली व नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र तिचाही मृत्यू झाला.

सदर घटनेची माहीती पाथरी पोलिसांना मिळताच ठाणेदार मंगेश मोहड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले व आरोपी धनराज गुरुनुले याला ताब्यात घेतले.

आरोपी विरोधात कलम 302,307 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे यांनी भेट दिली.या प्रकरणाचा तपास पाथरी चे ठाणेदार मंगेश मोहड हे करीत असून त्यांना नारायण येगेवार, अशोक मोहूर्ले, वसंत नागरीकर,सुरज शेडमाके, प्यारेलाल देव्हारे,जनार्धन मांदाळे, राजू केवट इत्यादी पोलीस सहकार्य करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×