भंडारा:- वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना भंडारा येथील वैनगंगेच्या मोठ्या पुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याची घटना मंगळवारला सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रवीण सुधाकर मुलुंडे (वय २४ ) , रा. दिघोरी (आमगाव ), ता. लाखांदूर या तरुणाने उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे शोधकार्यही करता येणे शक्य नाही. या प्रकरणी भंडारा पोलिसांचा तपास सुरू आहे. शोधमोहीम सुरु करण्यात आली असून अजून पर्यंत थांगपता लागला नाही.