गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपुर येथिल सरपंचा श्रीमंत भावना शैलेन मिस्त्री यांनी रस्ता बांधकामांचे चेक देण्यासाठी 31 हजार रुपयांची लाच मागितली होती परंतू तक्रारदारास 31 हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली असता तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून कारवाई केली सरपंचा श्रीमंती भावना शैलेन मिस्त्री ह्या आपल्या स्वतःच्या राहते घरी विवेकानंदपुर येथे पंचासमक्ष तडजोडीनेअंती 18 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना आज 29 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी सरपंचा श्रीमती. भावना शैलेन मिस्त्री यांच्यावर पोलीस स्टेशन मुलचेरायेथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोनि श्रीधर भोसले, पोहवा नथ्थु धोटे, पो.ना राजेश पदमगिरवार, पो.ना. श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, चापोहवा तुळशिराम यांनी केली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.