तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

भंडारा: लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील लोकमान्य विद्यालयातील मैदानावर वीज कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी | Batmi Express

Lakhandur,Lakhandur News,Bhandara,Bhandara Batmya,Bhandara News,Bhandara Live,

Lakhandur,Lakhandur News,Bhandara,Bhandara Batmya,Bhandara News,Bhandara Live,

प्रतिनिधी / भंडारा :
शाळेच्या मैदानावर वीज कोसळून दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील लोकमान्य विद्यालयात मंगळवारी (दि. १९) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही विद्यार्थिनींवर लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वैष्णवी अरविंद वावरे (१५, रा. मेंढा) आणि आचल तेजराम वाघधरे (१५, रा. इंदोरा, ता. लाखांदूर) अशी जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. मंगळवारी दुपारची सुटी झाल्याने विद्यार्थी वर्गाबाहेर आले होते. वैष्णवी आणि आचल मैदानाकडून वर्गखोलीकडे परत जात असताना अचानक वीज कडाडली आणि शाळेच्या मैदानावर कोसळली.त्यात या दोन्ही विद्यार्थिनी खाली कोसळून किरकोळ जखमी झाल्या. 

या दोघींनाही शिक्षकांनी तत्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती लाखांदूर येथील पोलिसांसह महसूल विभागाला देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.