'
30 seconds remaining
Skip Ad >

NEET Exam: नीट परीक्षेत मिळाले कमी गुण, अकोल्यातील तरुणीनं पुलावरून मारली उडी | Batmi Express

0

Akola,Akola News,Suicide,suicide news,

अकोला
: दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी लाखो उमेदवार नीट परीक्षेला बसतात. नीट ही परीक्षा खूप कठीण राहते. राज्यात नीट परीक्षेतील अपयशाच्या भीतीने काही विद्यार्थ्यांच्या (Student) आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. अकोल्यात दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात अपेक्षाप्रमाणे गुण कमी पडले. त्यामुळं एका तरुणीने टोकाचा निर्णय घेतला. 22 वर्षीय रोहिणी विलास देशमुख (Rohini Deshmukh) असं मृतक तरुणीचे नाव आहे. अकोला शहरातील मध्य भागात असलेल्या मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


काय आहे प्रकरण
अकोल्यात रोहिणी विलास देशमुख या तरुणीने आत्महत्या केली. शहरातील मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेत तिने जीवन संपवलं आहे. यापूर्वी रोहिणीने नीट परीक्षा दिली होती. मात्र, तिला या परीक्षेत 350 च्या जवळपास गुण मिळाले होते. आता यंदा म्हणजेचं दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात तिला 420 गुण मिळाले. रोहिणी ओपन प्रवर्गातून येत असल्याने तिला 565 च्यावर गुणाची अपेक्षा होती. मात्र अपेक्षाप्रमाणे तिला कमी गुण पडल्याने रोहिणी तणावात होती. काल रात्री नित्याप्रमाणे रोहिणीने कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर सर्व जण झोपून गेले. आज गुरुवारी पहाटे 5 वाजता झोपेतून उठून बाहेर पडली नाही. अन् या तणावातूनच तिने टोकाचा निर्णय घेतलाय. तिने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयानंतर कुटुबांला धक्का बसला. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

वडिलांचं डॉक्टर बनायचं स्वप्न अधूरं राहीलं
दरम्यान, रोहिणीचे वडील राजस्थानमध्ये राहतात. ती तिच्या मामाकडं अकोल्यात राहायची. वडिलांसह कुटुंबाचं रोहिणी डॉक्टर व्हावं असं स्वप्न होतं. मात्र आपण कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करू शकली नाही. दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात यश आलं नाही. वैद्यकीय क्षेत्रात काम करत बेटी बचाव या उपक्रमांतर्गत तिला अनेक काम करायचेही स्वप्न होती. दरवर्षी अनेक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. नीटच्या माध्यमातून घेतलेल्या प्रवेश परीक्षेद्वारे, विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासह इतर अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. रोहिणीदेखील याची तयारी करीत होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×