आत्ताची ब्रेकिंग! चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील नदीजवळ चारचाकीने दुचाकी स्वारास उडविले, एक जागीच ठार | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावलीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या चिमडा नदीचा पुलाजवळ दुचाकी व चार चाकी मध्ये अपघात होऊन त्यात दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 25 ला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडलेली आहे.

सावली तालुक्यातील रुद्रापूर येथील शुभम नीलकंठ नरुले वय 22 वर्ष असे या दुचाकीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असल्याचे कळते आहे. तो मूल वरून सावली कडे येत असतानाच गडचिरोली वरून चंद्रपूर कडे जाणाऱ्या चार चाकी शिफ्ट गाडीने त्याला उडविले त्यात त्याच्या जागीच मृत्यू झाला असून सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.