गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी शेतकऱ्याच्या बांध्यावर मुंडन आंदोलन
जुलै - ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीने आणि गोसिखुर्द- मेडिगट्टा धरणातील अति पाण्याच्या विसर्गाने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आणि दुबार- तीबार पेरणीचे संकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आले. अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर कोसळले जिल्ह्यातील शेतकरी कधी नव्हे तर आत्महत्या करायला लागले तरीही निद्रा अवस्थेत असलेल्या राज्यातील ED सरकारने अद्याप शेतकऱ्यांना आश्वासनाच्या पलीकडे काही देऊ शकले नाही अश्या सरकारचा निषेध करण्याकरिता व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ शेकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्या करिता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने थेट शेकऱ्यांच्या बांधावर मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी बांधवानी उपस्थित रहावे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.