चंद्रपुरात लम्पी रोग: राजुरा तालुक्यात 15 गावांतील जनावरांचे नि:शुल्क लसीकरण | Batmi Express

Chandrapur News,Lumpy Disease News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Lumpy disease,

Chandrapur News,Lumpy Disease News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Lumpy disease,

चंद्रपूर
: लंपी चर्म रोगाने राजुरा तालुक्यातील जनावरांना विळखा घातला मौजा रामपूर आणि आर्वी येथील जनावरांमध्ये सदर रोगाची लक्षणे आढळली आहेत. मौजा रामपूर येथे तीन आणि आर्वी येथे चार जनावरांना लंपी रोगाची बाधा झाल्याचे आढळून आल्याने जनावरांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तत्पूर्वी बाधित क्षेत्रातील आणि पाच किलोमीटर परिघातील एकूण 15 गावातील जनावरांना निःशुल्क लसीकरण करण्यात आले.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुचिता धांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.उमेश हिरुडकर, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. प्रमोद जल्लेवार यांनी रामपूर आणि आर्वी येथील जनावरांची तपासणी केली. यावेळी तहसीलदार हरीष गाडे आणि गट विकास अधिकारी  हेमंत भिंगारदेवे यांचे सहकार्य लाभले.

लंपी चर्म रोगाची लक्षणे : ताप येणे, चारा कमी खाणे, पाणी कमी पिणे, दूध उत्पादनात घट, त्वचेवर गाठी येणे, डोळ्यातून नाकातून स्त्राव वाहणे, लासिकाग्रंथिंना सूज येणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. गोठ्यातील स्वच्छता आणि ह्या रोगाचे मूळ असणारे गोचीड, चावणाऱ्या गोमाशा, चिलटे, डास ह्यांचे वर नियंत्रण केल्यास रोग प्रसारास अटकाव होईल. तसेच व्यवस्थित नियोजन केल्यास रोगावर नियंत्रण होवू शकते.

लसीकरण मोहिमेत पशुधन पर्यवेक्षक कैलाश राठोड, रंजीता मेडपल्लिवार, चारुता पेंढारकर, सूरज गेडाम, सुभाष आकुलवार, संदीप आडे, मोरेश्वर बुरांडे, परिचर श्री. वाढई, श्री.वंजारी, श्री. तामगाडगे श्री. शेडमाके, माधव राठोड, हुसेन, तसेच तालुक्यात पशुवैद्यकीय संस्थांना सेवा देणारे आदित्य बोबडे, श्री. निमकर, श्रेया पळसपगार, साक्षी बारापात्रे, शंकर वाढई, अजिंक्य रामटेके, अनिल चव्हाण आदींनी 15 गावांमध्ये एका दिवशी  लसीकरण करण्यास सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.