'

सभागृह बांधकामासाठी कोरची रमाई मंडळाची आमदार कृष्णा गजभे यांना निवेदन | Batmi Express

0

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची
: कोरची येथील रमाई बहुउद्देशीय सामाजिक महिला मंडळाची आरमोरी विधानसभा आमदार कृष्णाजी गजभे यांना आपल्या विकासनिधीमधून कोरचीत बौद्ध समाजासाठी सभागृह ईमारत बांधकाम करिता आर्थिक सहाय्यता मदत करावी म्हणून रविवारी निवेदन देण्यात आले. 

कोरची शहरातील बौद्ध समाजाची वार्ड क्रमांक १२ मध्ये २९५ सर्व्हे नंबरची ३७ आर जागा उपलब्ध आहे ही जागा रमाई मंडळाच्या नावे असून कोरची रमाई बहुउद्देशीय सामाजिक महिला मंडळ धर्मदाय आयुक्त यांचे नोंदणीकृत आहे. परंतु या ठिकाणी समाजाचे कुठलेही सभागृह नाही त्यामुळे आरमोरी विधानसभा आमदारांना आपल्या विकासनिधीमधून सभागृह इमारत बांधकामासाठी आर्थिक सहायता करावी अशी मागणी केली आहे. 
आमदार कृष्णा गजबे यांनी आमदार विकास निधीतून दहा लाख रुपये मदत करणार असल्याचे आश्वासन दिले असून आणखी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे समाजाकरिता विकास निधी मिळत असल्यास ती निधी आणण्यास मदत करणार असेही सांगितले. निवेदन देताना कोरची रमाई बहुद्देशीय सामाजिक महिला मंडळाचे अध्यक्ष सौ ज्योती भैसारे, सचिव सौ छाया साखरे, सौ जया सहारे, सौ शोभा साखरे, सौ सुमित्रा भैसारे  व बौद्ध समाजाचे पदाधिकारी जीवन भैसारे, गिरधारी जांभुळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×