मोठी बातमी! खर्रा खाताना ठसका लागून खर्रा खाणाऱ्याचा झाला मृत्यू | Batmi Express

Akola,Akola Live,Akola News,Maharashtra,

Akola,Akola Live,Akola News,Maharashtra,

अकोला
:- खर्रा खाताना ठसका लागून श्वास रोखले गेल्याने एका ३६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तुलंगा खुर्दमध्ये घडली. सचिन अविनाश आठवले (३६), असे या घटनेत जीव गमावलेल्याचे नाव आहे. या घटनेने खर्रा शौकिनांना धक्का बसला आहे.

तुलंगा खुर्द हे गाव चन्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीत आहे. सचिन याला खर्रा खाण्याचे व्यसन होते. यातूनच बुधवारी गावातील पान टपरीवर तो खर्रा घेण्यासाठी गेला. खर्रा घेतल्यानंतर घराकडे निघाला. वाटेतच त्याने खर्रा खाल्ला. पण, काही क्षणांतच त्याला श्वास घेणे कठीण होऊ लागले. नेमके काय झाले हे कळत नसल्याने कुटुंबीयांना कळविले गेले. तातडीने सचिनला वाडेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर नेमके कारण समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'बऱ्याच युवकांना गुटखा तोंडात ठेवून वावरण्याची सवय असते. यातील सुपारीचा एखादा कण श्वसननलिकेत अडकून अडचण निर्माण होऊ शकते. संबंधिताचा मृत्यूसुद्धा ओढवतो,' असे डॉ. सोनल मोदी यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.