सिंदेवाही : तालुक्यातील वासेरा गावातील वासुदेव कामडी (४४) यांनी जंगल परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्राप्त माहितीनुसार मृतक वासुदेव कामडी हा गावातील जंगल परिसरात शेळयां चारण्यासाठी जायचा. ३० जुलै ला सकाळी अंदाजे ६:१० वाजता बाहेर गेला होता. खुप वेळ होउन ही तो घरी आला नाही म्हणून घरच्या लोकांनी त्याची शोध मोहीम सुरु केली.वामन बोरकर यांच्या शेतालगतच्या एका झाडाला फाशी चा फंदा लावून झाडावर लटकलेल्या अवस्थेत दिसुन आला.
या संपूर्ण घटनेची माहिती सिंदेवाही पोलीसांना देण्यात आली. त्याआधारे सिंदेवाही पोलीसांनी घटनेच्या ठिकाणी पोहचुन पंचनामा केला व मृतकाचे शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात पी. एस. आय. सागर महल्ले व पोहन बळीराम गेडाम करीत आहेत.